आपला जिल्हा

‘प्रायश्चित्त’ कादंबरीत माणसांच्या महत्वाकांक्षेचे वास्तव चित्रण – डॉ. जयश्री सोन्नेकर

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचा 'एक दिवस एक पुस्तक' उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमाचे २१ वे पुष्प शुक्रवार ( दि. २३ ) रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हर्षा माकोडे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयश्री सोन्नेकर, सुमिता सबनिस यांची उपस्थिती होती. ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत प्रभाकर बागुल यांच्या ‘ प्रायश्चित्त’ या कादंबरीवर बोलताना डॉ. जयश्री सोन्नेकर म्हणाल्या की, ‘ माणसांच्या, विशेषतः स्त्रियांच्या महत्वाकांक्षेचे वास्तववादी चित्रण प्रभाकर बागुल यांच्या ‘प्रायश्चित्त’ या कादंबरीत येते. ही कादंबरी वाचताना जाणवते की, तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती कशी होती. या कादंबरीतून आपल्याला संयुक्त कुटुंबाचेही महत्त्व कळते. ‘ कार्यक्रमात जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या वतीने सन २०२२- २३ या वर्षाचा ( ग्रामीण विभाग ) ‘क’ वर्गाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष मीना जैन, ग्रंथपाल नेमीनाथ जैन यांचा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, अर्चना महादेव आगजाळ आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन अश्विनी ढाकणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रमा बाहेती यांनी केले. कार्यक्रमास चंद्रशेखर मुळावेकर, शैलजा वसेकर, सुरेश हिवाळे, शिरिष संघई,जयंत नाईक, नारायण चौरे, बाबासाहेब हेलसकर, सुरेखा रामदासी, उपेंद्र बेल्लुकर, रश्मी बाहेती, आशिष वाघमारे यांच्यासह शहरातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेलू : येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार मिळाल्याबद्दल कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष मिना जैन यांचा सत्कार करताना अर्चना आगजाळ, रमा बाहेती, डॉ. हर्षा माकोडे, डॉ. जयश्री सोन्नेकर आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!