आपला जिल्हा

मतदान जनजागृती रिल्स स्पर्धेत अनुष्का हिवाळे दुसरी ; जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा हस्ते सन्मान

परभणी ( प्रतिनिधी ) येथील श्री शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थींनी अनुष्का सुरेश हिवाळे हिने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित मतदान जागृती रिल्स स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला.

सदरील स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवार (दि.०१) रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक रविन्द्र सिंग परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपनिवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रा.गणेश शिंदे, नाट्य कलावंत मधुकर उमरीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
अनुष्काच्या यशाबद्दल श्री शिवाजी महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.प्रल्हाद भोपे आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!