आपला जिल्हा

सेलू नगरपरिषदेच्या स्थायी समिती शिक्षण व क्रीडा सभापती मिलिंद पवार

स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून उपसभापती साईराज बोराडे,बांधकाम सभापती मनीष कदम,पाणीपुरवठा सभापती श्रीमती गयाबाई सोनवणे

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू नगरपरिषदेच्या विविध विषय समिती स्थायी सभापती व सदस्याची निवड दि. 23 जानेवारीरोजी करण्यात आली. या वेळी पिठासन अधिकारी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभादेवी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष मिलिंद सावंत तसेच मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

स्थायी समिती सभापती म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत, स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून उपसभापती साईराज बोराडे,बांधकाम सभापती मनीष कदम,पाणीपुरवठा सभापती श्रीमती गयाबाई सोनवणे,महिला व बालकल्याण सभापती श्रीमती शिलाताई काजळे, उपसभापती श्रीमती आशाताई पहाडे, नियोजन व विकास सभापती गणेश सवणे, शिक्षण व क्रीडा सभापती मिलिंद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सर्व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे सह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
उप मुख्याधिकारी भगवान चव्हाण व निवडणूक विभागाचे कर्मचारी श्री आयुब पठाण व श्री मल्लिकार्जुन स्वामी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!