आपला जिल्हा

पेन्शनर असोसिएशन सेलू तर्फे आयोजित प्रजासत्ताक दिना निमित्त वसंत संगीतर रजनी कार्यक्रम संपन्न.

सेलू ( प्रतिनिधी ) दि.26 जानेवारी 2026 सोमवार रोजी पेन्शनर असोसिएशन सेलू आयोजित “वंदेमातरम् गीत150 वर्षे, प्रजासत्ताक दिन आणि स्व. वसंतराव जोशी स्मृती निमित्ताने” वसंत संगीत रजनी ” देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम सायंकाळी 5 ते 7-30 पर्यंत पेंशन भवन पाथरी रोड सेलू येथील “विसावा सभागृहात” संपन्न झाला. सुरुवातीला नारायण ईक्कर (सचिव) यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष शरद कुलकर्णी यांनी कार्यक्रम व वसंतराव जोशी यांच्या चरित्रावर प्रकाशझोत टाकून सर्व कलाकारांचा सन्मान केला व देशभक्ती पर गीतांच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन तथा निवेदक अशोक वानरे सरांनी आपल्या खुमासदार संचालनाने आरंभ केला.या कार्यक्रमात सहभागी प्रख्यात गायक व संयोजक आणि “शाम ए सरगम” चे सर्वेसर्वा शामसुंदर आढे यांनी भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ऐ मेरे वतन के लोगो’ आणि वि.दा.सावरकर रचित व मंगेशकर भावंडांनी गायलेले ‘सागरा प्राणतळमळला’ दोन्ही ही सुप्रसिद्ध व अवघड अशा गीताचे उत्कृष्ट सादरीकरण करुन प्रेक्षकांची दाद मिळवली!

तर दु.का.कुलकर्णी यांनी क्रांती गीत, आणि जयोऽस्तुते जयोऽस्तुते (सहगायक शाम आढे) अशोक वानरे सरांनी भारत का रहनेवाला हूं, रचित देशभक्ती गीत सादर केले.मोहन कुलकर्णी यांनी चिठ्ठी आई है, छोडो कलकी बातें हे गीत गायले.विनोद मोगल यांनी होठोपे सच्चाई रहती है, मेरे देसप्रेमीयों हे गाणे गायले. सदाशिव जाधव यांनी जय जय महाराष्ट्र माझा तर मोहन परदेशी यांनी दिल दिया है हे गाणे गायले गौतम सुर्यवंशी यांनी गदिमा चे वंदेमातरम्,मंगेश पाडगावकर यांचे चला निघू या सरसावूनी तर डॉ.शिवाजी शिंदे यांनी सारे जहाँसे अच्छा हे भारतरत्न लता मंगेशकर यांचे गीत गायले. अॕड. सुभाष भरदम यांनी स्वर्गसे सुंदर देश हमारा असे एकापेक्षा एक देशभक्तीने ओतप्रोत गीतांचे सर्व गायकांनी सरस सादरीकरण करुन उपस्थित पेन्शनर्स,महिला पुरुष आणि पत्रकार रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी सेलूतील प्रतिष्ठीत डॉ.शैलेश मालाणी,सह पत्रकार दिलीप डासाळकर, प्रदिप सोन्नेकर, कौसडीकर माकोडे सर बापूराव काळे संघटनेचे पदाधिकारी व महिलासह बहूसंख्य रसिकांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर अध्यक्ष शरद कुलकर्णी, उपाध्यक्ष विलास पाटील सह संयोजक शाम आढे यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपानंतर दु.का.कुलकर्णी सरांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!