आपला जिल्हा

नथुराम मुजांजी अंभुरे यांची साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी निवड

मा. मुख्यमंत्री महोदय व इतर मान्यवर मंत्री यांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण

सेलू ( प्रतिनिधी ) समाजातील दुर्बल व पिडीत घटकांसाठी करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सन. २०२०-२१ या वर्षातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार या पुरस्कारासाठी सेलू येथील नथुराम मुजांजी अंभुरे यांची निवड केल्याचे पत्र सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी गीता गुट्ठे यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाले आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा मा. मुख्यमंत्री महोदय व इतर मान्यवर मंत्री यांच्या उपस्थितीत दिनाक १२/३/२०२४ रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (NCPA) जमशेदजा भाभा नाटयगृह एन.सी.पी.ए मार्ग नरिमन पॉईंट मुंबई येथे आयोजित केलेला आहे.

पुरस्कारासाठी नथुराम मुजांजी अंभुरे यांची निवड झाल्या बद्दल परभणी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!