आपला जिल्हा
दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे महाआरती उत्साहात संपन्न !

सेलू ( प्रतिनिधी ) अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देशभर करण्यात आले त्याप्रमाणेच सेलू येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर मसोबा चौक येथे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत महा आरतीचे आयोजन केले होते.नादविहार संगीत परिवार,सेलू यातील कलावंतांनी गीत रामायणातील काही गीते,श्री गणेश स्त्रोत्र,श्री रामरक्षा स्त्रोत्र,हनुमान चालीसा,राम नाम जप सुमधुर वाणी तथा संगीतमय पद्धतीने सादर करत मंदिर परिसरात भक्तिमय चैतन्य निर्माण केले.गीत रामायणातील लंकेवरून अयोध्याला श्री राम परत आले हा सजीव देखावा परिसरातील चिमुकल्यांनी सादर करत उपस्थितांची मने जिंकली.श्रीराम व सीता यांच्या वेशातील कलावंतांची शोभायात्रा जयघोषाने काढत परिसर दणाणून सोडला या शोभायात्रेत लहान मुले,महिला भगिनी,पुरुष मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात उपस्थितांनी ढोल ताशांच्या व आतिषबाजीच्या आवाजात महाआरती करत प्रभू श्रीरामाचे मनोभावे पूजन केले.




