आपला जिल्हा

मीनाक्षी चित्रपटगृहात लवकरच झळकणार सत्यशोधक चित्रपट… फुलेप्रेमिंच्या मागणीला यश

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील मीनाक्षी चित्रपटगृहामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याबद्दल सामाजिक प्रबोधन करणारा सत्यशोधक चित्रपट सुरू करण्याची विनंती मीनाक्षी टॉकीजच्या मॅनेजर यांच्याशी केल्यानंतर त्यांनी यासाठी मान्यता देऊन किमान दोन शो घेण्यात येतील असे त्यांनी कळवले.

यासाठी बालाजी चिंचाणे, महादेव गायके,भागवत गिराम, बाळू गिराम, कृष्णा गिराम आदींनी मीनाक्षी टॉकीजच्या मॅनेजर यांच्याशी चर्चा केली आहे. तरी पुढील दोन ते तीन दिवसात सत्यशोधक हे चित्रपट मीनाक्षी टॉकीजला सेलूला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ग्रुप मधील सर्व सन्माननीय सदस्य यांनी या शोला निश्चितच पाहण्यासाठी उपस्थित राहावे व आपल्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा याबाबत माहिती कळवावी ही विनंती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!