आपला जिल्हा

सेलू येथे दर्पण दिन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त लोकमान्य टिळक यांना अभिवादन

सेलू ( प्रतिनिधी ) दर्पण दिनानिमित्त तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सेलू येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे, बाबासाहेब हेलसकर, मोहन बोराडे, सेलू तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर कटारे सतीश आकात संदीप वरकड, निरज लोया, गणेश सवणे यांची उपस्थिती होती.
ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पत्रकार मित्र, नागरिक यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!