आपला जिल्हा
सुरभी महोस्तव “महाराष्ट्राची लोकधारा” बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) , दि29 डिसेंबर सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवा अंतर्गत एल के आर आर प्रिन्स इंग्लिश नामांकित निवासी योजनेअंतर्गत प्रवेशित एकात्मिक अदिवासी प्रकल्प व धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचा‘ महाराष्ट्राची लोकधारा हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम (ता.२९) डिसेंबर शुक्रवार रोजी साई नाट्यमंदिर येथे पार पडला.

‘’ महाराष्ट्राची लोकधारा ” या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री टी डी भरड निरीक्षक समाज कल्याण परभणी, किशोर कटारे संपादक न्युज महाराष्ट्र 36 व पालक प्रतिनिधी नाथा रोडे,काशीराम सोनुले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संजय रोडगे यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कैलास पवार सरपंच शिंदे टाकळी,दादासाहेब बोंबले सरपंच डासाळा, प्रभाकरराव गजमल प्रकाश गजमल , संजय गटकळ, रुस्तुम कुरडे, किशोर कारके,श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे ,प्रिन्स इंग्लिश प्राचार्य प्रगती क्षीरसागर, कार्तिक रत्नाला आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.




