आपला जिल्हा
ग्रामीण पत्रकार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – एस एम देशमुख
⬛ डिजिटल मीडियाला संघटनेत सोबत घेणे अत्यंत गरजेचे

सेलू ( प्रतिनिधी ) ग्रामीण पत्रकार म्हणजे उपेक्षित वर्ग आहे . त्यासाठी आपण ग्रामीण पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार अशी ग्वाही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुबई चे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सेलू येथील पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलतांना दिली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न सेलू तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया यांच्या वतीने आज दि ११ ऑक्टोबर २३ रोजी पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




