आपला जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार*

सेलू (प्रतिनिधी ) येथे २९ ऑगस्ट रोजी तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व स्पिरीट स्पोर्ट्स फिटनेस व नूतन विद्यालय वतीने उत्साहात साजरा करण्यात आला ‌.

क्रीडा शिक्षक हे उद्याचे मेजर ध्यानचंद सारखे राज्य, राष्ट्रीय खेळाडु आपल्या देऊ शकतात.
खेळास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे ‌ तसेच क्रीडा क्षेत्रात शासनाने खेळाडुला शासकीय नौकरी मध्ये 5 टक्के आरक्षण लागू केले आहे. खेळातून आदर्श व्यक्तिमत्व तयार होतो. खेळाचे महत्व पटवून दिले.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ‌
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रशेखर नावाडे, प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक समाधान चवरे, केशवराज बाबासाहेब महाराज संस्थानचे उपाध्यक्ष सतीश दिग्रसकर, पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर, टेनिस व्हॉलीबॉल जिल्हा सचिव सतिश नावाडे, राज्य सचिव गणेश माळवे, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय खेळाडू चा स्पिरीट स्पोर्ट्स व फिटनेस शॉप वतीने खेळाडू उंची मोजण्यासाठी तक्ता व शिटी देऊन आर.बी. चव्हाण, रामेश्वर कदम, कौसडीकर, किशोर नाईक, संगीर फारोकी, सुरज शिंदे, राजेश राठोड, राष्ट्रीय खेळाडू राहुल घाडगे, वेदांत घांडगे, कौस्तुभ दिग्रसकर, स्वप्निल चव्हाण, अश्विन केदासे, सोमनाथ महाजन, कृष्णा होलिया, सत्कार करण्यात आला.
सुञसंचलन किशोर डोके तर आभार प्रदर्शन प्रशांत नाईक यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!