आपला जिल्हा

सेलू रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रवास किरायाच्या रूपाने वर्षात 8 कोटी 39 लाख 94 हजार च्यावर महसूल

सेलू ( प्रतिनिधी ) स्थानकातून रेल्वे प्रवास किरायाच्या रूपाने सेलू रेल्वे स्थानकात जवळपास वर्षाची तिकिटाची विक्री आठ कोटीच्या वर जात असल्याचे एका माहिती अधिकारातून समोर आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की सेलू येथील विजयकुमार मंत्री यांनी मंडल रेल प्रबंधक कार्यालय (वाणिज्य शाखा), नांदेड़ मंडल, द.म.रे. यांनी माहिती अधिकारात पत्र देऊन सेलू रेल्वे स्थानकातून प्रवाश्याच्या रूपाने दरवर्षी किती महसूल जमा होतो या बाबत माहिती आरटीआय कायदा, 2005 च्या तरतुदींनुसार माहिती ऑनलाइन आरटीआय अर्ज 04 मे रोजी पाठवला होता.


त्यांना दि. 07 मे रोजी मिळालेल्या उत्तरात सेलू स्टेशन (नांदेड विभाग) सेलू स्टेशनच्या वर्ष 1-4-2025 ते 31-3-2026 च्या वार्षिक संकलनाची रक्कम रु.-8 कोटी 39 लाख 94 हजार 264 तिकिटातून उपलब्ध होत असल्याची माहिती शैलेश कुमार सिंग असिस्टंट कमर्शियल मॅनेजर आणि एपीआयओ, नांदेड यांनी दिली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!