आपला जिल्हा

राणीसावरगांव येथील गोशाळेतील कडब्याच्या 50000 पेंड्या आगीत खाक, गोशाळेसमोर मोठे संकट

परभणी ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगांव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेतील चारा साठवणूक क्षेत्रातील कडब्याच्या पेंड्यांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याने सुमारे 50 हजार कडब्याच्या पेंड्या जळून पूर्णपणे भस्मसात झाल्या. त्यामुळे या आगीत अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दुर्देवी घटना 7 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली.

या गोशाळेत सुमारे 600 गोमातांचे पालन-पोषण केले जाते. त्यासाठी वर्षभरासाठी चारा साठवून ठेवला जातो. चारा साठवणूकीच्या त्या क्षेत्रास गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आणि आगीने क्षणार्थात रौद्ररुप धारण केले व 50 हजार पेंढ्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे आता या गो शाळेतील 600 जनावरांसाठी चारा संकट निर्माण झाला आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!