आपला जिल्हा
गोशाळे मधील गाईंना पेंड हिरवा चारा देऊन औक्षण
माणुसकीचे प्रवेशद्वार या उपक्रमांतर्गत कार्यक्रम

सेलू ( प्रतिनिधी )ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सेलू व शांती दूत परिवार पुणे शाखा सेलू, आणि शाम ए सरगम संगीत परिवाराच्या वतीने माणुसकीचे प्रवेशद्वार या उपक्रमांतर्गत दि. 6 मे रोजी सेलू येथील श्री संत गोविंदबाबा दादुपंथी मठ गोशाळे मधील जवळपास 200 गाईंना पेंड, ओला हिरवा चारा,चणाडाळ,गुळ खाऊदेऊन गोमातेचे सुवासिनींच्या हस्ते औक्षण, खण,वस्त्रमाळा घालून पूजन करण्यात आले.




