आपला जिल्हा

म.बसवेश्वर जयंती साजरी करण्याची मागणी….शिवा संघटनेचे निवेदन

सेलू (प्रतिनिधी ) मध्ययुगीन काळातील महान संत समता नायक , विरशैव धर्मप्रसारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासन निर्णया प्रमाणे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी अशी मागणी शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी सेलू यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ना.तहसिलदार कृष्णा देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 19 एप्रिल रविवार रोजी अक्षयत्रतियेच्या दिवशी शासन निर्णय प्रमाणे तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात म. बसवेश्वर जयंती साजरी करण्याबाबत कार्यालय प्रमुखांना आदेशीत करावे. निवेदनावर उपजिल्हा प्रमुख शिवकुमार नावाडे, तालुका प्रमुख निजलिंगआप्पा तरवडगे, प्रसिद्धी प्रमुख देवराव चौरे, विशाल लोया, सतीश भोसले, शाम कटारे, राम कटारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!