आपला जिल्हा

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यातर्फे अभिवादन

परभणी, दि. 11 (प्रतिनिधी ) : सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्यभर कार्य करणारे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज परभणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, महापौर सय्यद इकबाल, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!