आपला जिल्हा

सेलू उपनगराध्यक्ष पदी साईराज बोराडे यांची बिनविरोध निवड

स्वीकृत सदस्य म्हणून हेमंतराव आडळकर, अशोक नाना काकडे, विनोद बोराडे यांची निवड

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू नगर परिषदेच्या |उपाध्यक्षपदी भाजपचे साईराज मुकेशराव बोराडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बुधवार, दि.१४ जानेवारी रोजी संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांची निवड हे विषय ठेवण्यात आले होते. त्यानुसार उपाध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पक्षाचे साईराज बोराडे यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भाजपा कडून सेलू नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी विनोद बोराडे, अशोक काकडे यांची तर काँग्रेस तर्फे हेमंतराव आडळकर यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत तर सचिव म्हणून मुख्याधिकारी तुकाराम कदम यांची उपस्थिती होती. उपाध्यक्षसह स्वीकृत सदस्यांची निवड झाल्यानंतर नगरपरिषद आणि परिसरात डीजेच्या तालवर एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला. निवडी नंतर भाजपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून एकच जल्लोष केला. तर माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी साईबाबा बँक परिसरात अभिनंदनाचा वर्षाव केला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!