आपला जिल्हा

कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू तर्फे शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा

शेतकऱ्याची प्रगती झाली तरच राष्ट्र प्रगती करेल -डॉ. संजय रोडगे

सेलू (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या कष्ट, निष्ठा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानातील योगदानाचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय “शेतीनिष्ठ पुरस्कार – २०२५” या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मधुसूदन जीनिंग, सेलू येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शेतकरी बांधव, कृषितज्ञ, समिती सदस्य व नागरिक अशा शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक बळीराजा पूजनाने करण्यात आली.

या प्रसंगी संचालक श्री. माऊली ताठे, श्री. माऊली राऊत, श्री. अजय डासाळकर, श्री. सुरेन्द्र तोष्णीवाल, श्री. अनिल पवार, श्री. रामेश्वर राठी, श्री. शैलेश तोष्णीवाल, श्री. केशव सोळके, श्री. भास्कर पडघन, श्री. अनिल बर्डे, श्री. सोलणके अप्पा, श्री. कैलास रोडगे, श्री. प्रकाश गजमल, श्री. कैलास पवार, श्री. बद्रीनाथ बरसाले, श्री. उद्धव खेडेकर, श्री. किशोर कारके आदी मान्यवर उपस्थित होते.

शेतीनिष्ठ पुरस्कार – २०२५ विजेत्यांचा सन्मान

 

निवड समितीद्वारे ठरविण्यात आलेल्या शेतीनिष्ठ पुरस्कार – २०२५ मध्ये खालील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला : सेंद्रिय शेती – श्री. सोमेश्वर गिराम, फळबाग लागवड – श्री. नारायण लहाने, श्री. गोविंद सोळंके, प्रक्रिया उद्योग – श्री. संभाजी गजमल, सौ. लक्ष्मी कुंडलिक टाकसाळ, कापूस लाड तंत्रज्ञान – श्री. प्रवीण रोडगे, रेशीम उद्योग – श्री. अशोक लहाने, भाजीपाला उद्योग – श्री. अशोक नाईकनवरे, गांडूळ खत प्रकल्प – श्री. महेंद्र वाटूरे., शेतकरी उत्पादक कंपनी – श्री. सुनील पोळ, दुग्ध व्यवसाय – श्री. ज्ञानोबा बरसाले, झेंडूपासून अगरबत्ती उद्योग – सौ. सखुबाई तुकाराम पाथरकर, हळद व ऊस – श्री. उद्धवराव वाघ, ऊस उत्पादक – श्री. रामेश्वर घोडके, टमाटा व ऊस – श्री. गुलाबराव डासाळकर, इतर विशेष श्रेणीतील पुरस्कार – श्री. दिगंबर गायकवाड, श्री. बळीराम राऊत, श्री. नागेश साडेगावकर, श्री. आसाराम राऊत सर्व विजेत्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू, डॉ. संजय रोडगे यांनी त्यांच्या प्रभावी भाषणातून शेतकऱ्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांनी म्हटले –
“मातीत उभा राहून कष्टाच्या घामाने सोने पिकवणाऱ्या हातांचा हा सन्मान केवळ पुरस्कार नाही, तर समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे.” शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे ही केवळ आर्थिक गरज नसून, त्यांच्या जीवनमानाच्या उन्नतीची मूलभूत आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी बाजार समिती सातत्याने सकारात्मक उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. रोडगे यांनी पुढे खालील मुद्द्यांवर भर दिला –आधुनिक मार्केट यंत्रणा, पारदर्शक तोल व्यवस्था, दर्जानुसार निवड, आणि थेट शेतकरी–बाजार जोडणी, पिक विविधता, पूरक व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगाचा प्रसार, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आर्थिक बळकटी, मार्गदर्शन, विमा संरक्षण आणि मानसिक आधार, ड्रिप, स्प्रिंकलर, सोलर पंप, हवामान आधारित साधने, माती परीक्षण आणि डिजिटल कीटकनियंत्रण यासारख्या तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांसाठी तज्ञ शिबिरांची मालिका, ज्यामध्ये पिक नियोजन, जल व्यवस्थापन, बाजारभाव अंदाज, कर्ज व विमा व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. पुढे बोलताना म्हणाले की,
“शेतकरी प्रगती केली तरच राष्ट्र प्रगती करते. त्यांच्या हितासाठी समिती सातत्याने काम करेल. कोणत्याही अडचणीत शेतकरी एकटा राहणार नाही, हा आमचा निर्धार आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रभारी सचिव श्री. दीपक शिंगणे व सर्व कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!