आपला जिल्हा

नूतन विद्यालय केंद्रावर रेखाकला परीक्षा उत्साहात

सेलू शहरातील २५४ विद्यार्थ्यांचा सहभाग

सेलू ( प्रतिनिधी)  उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कला संचलनालय महाराष्ट्र राज्य, कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा सेलू शहरातील नूतन विद्यालय केंद्रावर उत्साहात पार पडली. २४ ते २७ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही स्तरांवरील परीक्षा नूतन विद्यालय, सेलू या केंद्रावर पार पडल्या.

या केंद्रावर दोन्ही परीक्षांसाठी एकूण २५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात एलिमेंटरी परीक्षेसाठी सुमारे १४३ विद्यार्थी प्रविष्ट होते, तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी १११ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या केंद्रावर सेलू शहरातील नूतन विद्यालय, नूतन कन्या प्रशाला, नूतन इंग्लिश स्कूल तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळांचे विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते.
केंद्रप्रमुख तथा नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल आणि शंकर बोधनापोड यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकेंद्रप्रमुख तथा कला विभाग प्रमुख आर.डी.कटारे यांच्यासह कलाशिक्षक फुलसिंग गावित, मीरा शेटे,नंदकिशोर चव्हाण, बाबासाहेब गोरे, विरेश कडगे आणि स्वप्नील चव्हाण यांनी परीक्षेचे कामकाज पाहिले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!