सेलू (प्रतिनिधी) पर्यावरण रक्षण व नैसर्गिक संतुलनासाठी वृक्षरोपन व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंब व प्रत्येक नागरिकांने वृक्षारोपन केले पाहिजे त्यासाठी वृक्षारोपन एक सामाजिक चळवळ झाली पाहिजे असे मत रामनाना पाटील यांनी व्यक्त केले.
येथील कै.सौ. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात दिपस्तंभ प्रतिष्ठान व आर्यवैश्य महासभा तालूका शाखा सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आर्यवैश्य महासभेचे सुधिर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य बुधवार दिनांक 30 जुलै रोजी आयोजित वृक्षारोपन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिपस्तंभ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री माधवआण्णा लोकुलवार ,उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, महिला मंडळ सचिव श्रीमती ललिता भाभी गिल्डा, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीबल्लभ जी लोया , सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, माजी न प सदस्य मनिष कदम , शहराध्यक्ष अशोक शेलार, मुंजाभाऊ भिसे, कॉ. अशोक उफाडे, आर्यवैश्य महासभेचे बालाजी मोटलवार , विकास गादेवार, बालाजी काचेवार, अनिल बंडेवार, शशिकांत मालशेटवार, प्रविण कोत्तावार, बाळासाहेब काजळे, विनोद शेरे, निरज लोया, शेख सिराज, सचिन सावंगीकर, संचालक प्रफुल्ल बिनायके, चंद्रशेखर नावाडे, डॉ.आशिष डख,सौ. मंजुषा शेलगावकर, सौ. रूपा ठाकुर ,करूणा बागले, सौ कुंदनानी, सौ. संध्या चिटणीस, सौ राजश्री लोकुलवार, मुख्याध्यापक डी.डी. शिंदे ,सचिन सावंगीकर , गणेश गोरे यांची उपस्थिती होती. या वेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. सौ. मंजुषा शेलगावकर यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर नावाडे, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर भरत रोडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्यवैश्य महासभेचे ज्ञानेश्वर फुटाने, राजश्री फुटाने, मोहन कोत्तावार , मंजुषा कोत्तावार, गजानन फुटाने, नागनाथ कलकोटे, सविता कलकोटे, कैलास मरेवार, आश्विनी मरेवार, मुख्याध्यापक बी.आर.साखरे, रोहिदास चव्हाण,अभिमान पाईकराव, विजय हिरे, संदीप जुमडे, सौ. उषा कामठे, सौ. अर्चना फोपसे, आनंद देवधर, विष्णू सरकटे,नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे, सौ साडेगावकर, श्रीमती फुलारी यांनी परिश्रम घेतले.