आपला जिल्हा

समृध्दी महामार्गावारील बाधित जमीनीचा मावेजा मिळन्यासाठी उद्या रस्तारोको आंदोलन

⬛ समृध्दी महामार्गावारील बाधित शेकडो शेतकरी महिला व पुरूष होणार सहभागी

सेलू ( प्रतिनिधी ) 16/04/2025 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब परभणी व सक्षम प्राधिकारी भुसंपादन जालना-नांदेड समृधी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी सेलू यांना दि. 04/10/2024 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय दरनिश्चीती समितीने मंजूर केलेल्या प्रपत्र 1 ला मान्यता मिळाल्या प्रमाणे जमीनीचा मावेजा मिळणे बाबत अर्ज दिला होता. त्यामध्ये दि.19/04/2025 रोजी देवगांव फाटा ते सेलू रोडवरिल चिकलठाणा फाटा येथे रस्तारोको आंदोलनांचा इशारा दिला होता परंतू सदर रस्तारोको आंदोलन हे आम्ही दि. 19/04/2025 रोजी चे करण्याचे स्थगीत करण्यात आले असून आमच्या मागण्या मान्य न झाल्याने सदर रस्तारोको आंदोलन हे दि. 21/04/2025 वार सोमवार रोजी सकाळी 09 30 वाजता देवगांव फाटा ते सेलू रोडवरिल चिकलठाणा फाटा येथे रस्तारोको आंदोलन करणार आहेत.

सदर आंदोलनामध्ये जवळा जिवाजी, चिकलझााण बु, चिकलठाण खु रायपूर, हातनूर, वालूर, तांदुळवाडी, हटटा, गुळखंड अशा 9 गावाचे समृध्दी महामार्गावारील बाधित शेतकरी 500 तू 600 महिला व पुरूष सहभागी होणार असून आंदोलनामध्ये वैलगाडयासुध्दा घेवून येणार आहोत असा उग्र स्वरूपाचा रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन मा. उपविभागीय अधिकारी, तथा भुसंपादन अधिकारी, सेलू,यांना देण्यात आले.या निवेदनावर रामेश्वर विठठलराव गाडेकर, रायपूर, रमेश साहेबराव माने, तांदुळवाडी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!