आपला जिल्हा

सेलू नगरपालिकेची 70 लाख 20 हजार 274 रुपये थकबाकी वसुलीसाठी सेलू मार्केट कमिटीला सील

⬛ सेलू नगरपालिकेच्या कर निरीक्षकांची कार्यवाही

सेलू ( प्रतिनिधी )सेलू मार्केट कमिटी यांच्याकडे नगरपालिकेची विविध मालमत्ता संबंधी तब्बल 70 लाख 20 हजार 274 रुपये ( 2024 – 25 ) या वर्षाचे येणे बाकी असल्याने सेलू नगरपालिकेच्या कर निरीक्षक पाथकाने गुरुवार दि 27 फेब्रुवारी रोजी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकून कारवाई केली आहे.

मार्केट कमिटी सील करून त्यावर लावले पोस्टर

नगर परिषद, सेलू यांची कृ.उ.बा.स. कडे विविध मालमत्ता संबंधी साल सन 2024-2025 पर्यंतची रक्कम रूपये 70,20,274/- येणे बाकी आहे. सदर रक्कम भरणेकरिता तुम्हाला वेळोवेळी मागणी बिल / स्मरणपत्र दिलेली आहेत. तसेच सदरील जागेचा कर भरना न केल्यामुळे नाईलाजास्तव 3 तासाच्या कालावधीत कर वसुली करिता अटकावणी बाबत पुर्वसुचना देण्यात येत आहे. या कालावधीत दिलेल्या अंतिम मुदतीत आपले आवश्यक अभिलेख काढुन घ्यावेत जेणे करून अत्यंआवश्यक कामावर परिनाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

करिता थकित कराचा भरणा न केल्यामुळे महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 152, 156 मधील तरतुदी नुसार स्थावर व जंगम मालमत्तेची अटकावणी/ जप्ती करून आणि ती विकुन वसुल करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!