आपला जिल्हा

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

सेलू ( प्रतिनिधी )  19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हा कार्यक्रम श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर डॉ. संजय रोडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या काळात असलेली आवश्यकता स्पष्ट केली. तसेच, शाळेमध्ये पुतळा उभारण्यामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या प्राचार्य प्रगती क्षीरसागर, उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास ताठे, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे आणि डी.एड. कॉलेजच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी रत्नपारखी यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आकात यांनी केले. विशेष आकर्षण म्हणून चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच, काही विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित आपली मनोगते व्यक्त करत छत्रपतींच्या कार्यावर प्रकाश टाकला.

या प्रसंगी पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!