आपला जिल्हा
विद्यार्थांना शिकवण्या पेक्षा शिकते करा – प्राचार्य डाॅ.विकास सलगर

सेलू ( प्रतिनिधी ) येणाऱ्या काळा सोबत शिक्षकांनी अद्ययावत रहावे.या दृष्टीने शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणातून नवीन अध्ययन अध्यापन व मूल्यमापन तंत्र अवगत करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.विकास सलगर यांनी तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण २.० सेलू येथील शारदा विद्यालय येथे शिक्षकांना मार्गदर्शन करताना केले.




