आपला जिल्हा

स्वस्ति जिनेशजी काला विद्यार्थिनीस राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत  2,22,222 रुपयाचे द्वितीय पारितोषिक 

बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल सेलूची विद्यार्थिनी

सेलू ( प्रतिनिधी ) बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी कु.स्वस्ति जिनेशजी काला हिने महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीने घेतल्या गेलेल्या श्री भगवान महावीर स्वामी निर्वाण महोत्सव समिती आयोजित महावीर स्वामी जीवन चरित्रावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कु.स्वस्ति जिनेश जी काला हिचा राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक आला आहे. आज दिनांक 02 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई राजभवन दरबार येथे या स्पर्धेच्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
मुंबई राजभवन दरबार या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल श्री.सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते रू.2,22,222/- रुपये रोख पारितोषिक मिळाले. यशस्वी विद्यार्थिनी स्वस्ति जिनेश जी काला व तिच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!