आपला जिल्हा

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात तिळगुळ व शैक्षणिक साहित्य वाटप

मकर संक्राती सणाचे औचित्य साधून दीडशे मुलींसाठी तिळगुळ व शैक्षणिक साहित्य वाटप

सेलू ( प्रतिनिधी ) दि. 24 जानेवारी शुक्रवार रोजी शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये मकर संक्राती सणाचे औचित्य साधून दीडशे मुलींसाठी तिळगुळ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव शेळके, मुख्याध्यापिका सुनीता वेडे, गृहप्रमुख प्रेरणा पवार, प्रजापिता ईश्वरीय विद्यालय सेलू येथील बहन वैशाली यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनिता वेडे यांनी केले.

यावेळी बहन वैशाली यांनी बालिकांना मकर संक्रांती सणाचे महत्व, भारतीय संस्कृती कशी श्रेष्ठ आहे, तिळगुळ वाटपाचे महत्त्व काय आहे,तिमिरातूनी तेजाकडे जाताना आवश्यक असणारी शिदोरी याबरोबरच चांगल्या सवयी अंगी जोपासण्याचे आवाहन बालिकांना केले.

यावेळी चंद्रभागा प्रल्हादराव शेळके यांनी 150 बालिकांना पेन, तिळगुळ आणि मेहंदी कोन तर शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी डायरी, पेन आणि तिळगुळाचे वाटप केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी तर उपस्थितांचे आभार कु. वृषाली साखरे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिता राऊत, सुहास नवले, शिवाजी कोकर,उषा लोंढे,अपर्णा काळे, शिवमाला मोरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!