आपला जिल्हा
अन्यायाविरुद्ध न्यायाचा रथ चालवा! ह.भ. प.प्रसाद महाराज काष्टे

सेलू ( प्रतिनिधी ) दि. 21 जानेवारी 2025 समाजात कितीही वाईट प्रवृत्तीची लोक असली तरीही आपण आपला चांगुलपणा सोडू नये अन्यायाविरुद्ध आपण सतत लढत राहिलं पाहिजे आणि आपल्या न्यायाचा रथ चालवला पाहिजे. यासाठी चांगली माणसं जोडणं अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अंगी धीटपणा अंगीकारावा जो प्रयत्नांनी येतो.




