आपला जिल्हा

सेलू तालुक्यात राजकीय भूकंप….. सेलू तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी अजित पवार  गटात आज प्रवेश

सेलू (  प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सेलू तील अनेक राजकीय नेते अजित दादा पवार यांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती न्युज महाराष्ट्र 36  च्या हाती आली आहे.
आज शिर्डी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्या प्रसंगी सायंकाळी पाच वाजता  जिंतूर तालुक्याचे काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस  ज्यांनी नुकतीच विधानसभेची निवडणूक वंचित कडून लढवली होती सुरेश भैया नागरे, वालूर चे सरपंच तथा जिल्हा परिषद माजी सभापती संजय साडेगावकर, नाना राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते आज राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यांच्या या प्रवेशाने सेलू तालुक्याच्या राजकारणात नक्कीच बदल घडेल अशी शंका जाणकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

Related Articles

Back to top button
Don`t copy text!