आपला जिल्हा

सुदृढ आरोग्य हाच यशाचा मार्ग–डॉ.सुवर्णा नाईकनवरे

निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) सुदृढ व निरोगी शरीरात निरोगी मन, विचार निर्माण होतात, सुदृढ आरोग्यातूनच यशाचा मार्ग जातो त्यामुळे प्रत्येक पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन स्त्रीरोगतज्ञ डॉ.सुवर्णा नाईकनवरे यांनी केले.

येथील ग्लोबल केअर फाऊंडेशन छत्रपती संभाजी नगर, श्री रामजी भांगडीया रूग्ण सेवा मंडळ, गांधी प्राकृतिक चिकित्सा योग्य मंडळ सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय निबंध स्पधेचे पारितोषिक वितरण करताना योगा हॉल मध्ये बुधवार दि ९ आक्टोबर रोजी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून बालरोगतज्ञ डॉ.योगीता मालाणी, महंमद इलियास, अशोक पारगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, टीशर्ट , प्रोटीन पावडर, पेन देऊन गौरवण्यात आले. विजेत्या स्पर्धांमध्ये
प्रथम-दुर्गा मगर (नूतन विद्यालय),
द्वितीय-अनुष्का खंदारे (नूतन कन्या प्रशाला) ,
अनिरुद्ध मगर (यशवंत विद्यालय),
तृतीय–शेख सिमर (शारदा विद्यालय),
श्रद्धा बोराडे(के.बा.विद्यालय) तर
उत्तेजनार्थ
शेरखान पठाण (न्यू हायस्कूल)
वाघ अंजना( यशवंत विद्यालय) सानप शुभांगी (नूतन विद्यालय) साळवे प्रज्ञा (नूतन कन्या प्रशाला) या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक डॉ.काशीनाथ पल्लेवाड,विजय हिरे,सौ देशमुख व परिक्षक सौ किर्ती राऊत यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पारगावकर, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर भगवान पावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवनारायण मालाणी,हितेश शहा, श्री वल्लभ राठी,डॉ शैलेश मालाणी, आनंद सोनी आदींनी परीश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!