आपला जिल्हा

शालेय जिल्हा क्रिकेट स्पर्धेत पुर्णा, सेलू, जिंतूर, परभणी वर्चस्व

सेलू ( प्रतिनिधी ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या वतीने शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दि. ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या.

सदरील क्रीडा स्पर्धेत १४/१७/१९ वर्षे आतील मुले मुली गटात ३८ संघांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन पोलिस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्रीराम प्रतिष्ठान सेलू अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, प्रमुख उपस्थिती क्रीडा अधिकारी रोहन औढेंकर, डॉ. प्रविण जोग, राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू संदिप लहाने, गणेश माळवे, प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे,प्रा नागेश कान्हेकर, यांनी आभार मानले मानले.
स्पर्धेतील अंतिम निकाल
१९: वर्षे मुले :-
विलासराव देशमुख उर्दु मा. उच्च शाळा जिंतूर:-प्रथम
2) शांताबाई नखाते मा. उच्च मा. शाळा (आश्रम शाळा) वालूर (द्वितीय)
17 वर्ष मुले
1) पोदार इंटरनॅशनल धर्मापुरी, परभणी :-प्रथम
2) न्यु इरा सेकंडरी स्कुल जिंतूर :-द्वितीय
14 वर्ष मुले
1) ज्ञानतिर्थ विद्यालय सेलू :-प्रथम
2) विलासराव देशमुख उर्दू शाळा जिंतूर: व्दितीय
3) खान अब्दूल गफार खान मानवत: तृतीय
मुली * 19 वर्ष *
1) गुरुबुध्दी महाविद्यालय पूर्णा… प्रथम
2) सामेश्वर मा. उच्च, मा. धर्मापूरी परभणी : व्दितीय
17 वर्ष मुली :के.जी.बी.व्ही पूर्णा:प्रथम
2) जवाहर विद्यालय जिंतूर – द्वितीय

पंच प्रमुख राजेश राठोड,प्रमोद गायकवाड,चरणसिंग तंवर,
राहुल घाडगे,जिशान सिद्दीकी, योगेश आदमे, शेख मोईन
अलीम पठाण,शेख नावेद,भारत झोडग आदित्य आडळकर,दिपक जोरगेवार,दिपक निवळकर, अक्षय खीळकर,गजानन शेलार

Related Articles

Back to top button
Don`t copy text!