आपला जिल्हा

सामाजिक बांधिलकी वाढवावी–इंजि.बी.एस.कोलते

सेलूत अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांचा कार्य गौरव श्रीराम कंस्ट्रक्शनचा उपक्रम

सेलू (प्रतिनिधी ) समाज व देशाच्या सांस्कृतिक व भौतिक विकासात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, आधुनिक काळातील समाजाच्या गरजा लक्षात घेऊन काम करण्यासाठी सामाजिक बांधिलकी वाढवावी असे आवाहन इंजि. भास्करराव कोलते यांनी केले.

येथील श्रीराम कंस्ट्रक्शन व स्टोन क्रशरच्या वतीने अभियंता दिन व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त १५ सप्टेंबर रविवार रोजी कुपटा येथे आयोजित सत्कार समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सां.बा.विभागाचे उपअभियंता बळीराम माने, इंजि. सतिश बलदवा,इंजि.दिपक कुपटेकर , इंजि.संग्राम सोनी, शामराव मते माजी बांधकाम सभापती, ज्ञानेश्वर राऊत संचालक कृषी उत्पन बाजार समिती, इंजी. पृथ्वीराज भांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियंता दिनानिमित्त श्रीराम कंस्ट्रक्शन च्या वतीने सेलू-जिंतूर तालुक्यातील सर्व अभियंत्यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी पांडुरंग धामणगावकर,बालाजी उदावंत यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुण्यांनी अनुभव, कामाची गुणवत्ता व एकमेकांच्या सहकार्याने विकास करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष इंजि सुशील नाईवाडे, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर ज्ञानेश्वर मते यांनी आभार मानले. या वेळी इंजि. आर.जे.पठाण,गंगाधर आडळकर , प्रशांत माणकेश्वर,प्रशांत सोन्नेकर,रवी मंत्री,गजानन आडळकर, भगवान कुमावत, शेख आर्शद, हादी अन्सारी, योगेश गजमल , शेख मुजमिल, अभिमन्यू घुगे, शेख अनिस, शेख रेहान , तेजस कडे, प्रशांत इंगोले, अब्दुल राफे, प्रध्मुन राठोड, राहुल सोलापूरे,युनुस शेख,असलम मोदी, शेख अझहर, शेख फरहान,अनुराज मालाणी, यासेर शेख,उदय दडके, पुरूषोत्तम शिदे मामा ,प्रमोद कुलकर्णी,विनीत मालानी,योगेश गजमल,मधुकरराव पौळ,भगवानराव जाधव,बालचंदानी,रोहन आकात,संदीप आडळकर, सिध्दू खोसे पाटील,शंभू काकडे,बाबाराव वायाळ आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम कंस्ट्रक्शनचे संचालक दत्तात्रय सोळंके, नितीन सोळंके, कैलास राऊत,ओमराजे मते, विठ्ठल झांजे, रामेश्वर शेवाळे, शिवाजी शेवाळे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!