आपला जिल्हा
चित्रकला स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ – शिवाजी मगर
नूतन विद्यालय केंद्रावर चित्रकला स्पर्धेस उस्पुर्त प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) चित्रकला स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. नूतन विद्यालय केंद्रावर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ,आणि शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद, परभणी यांच्या मार्फत राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा १३ ऑगस्ट २०२४ मंगळवार संपन्न झाल्या.




