आपला जिल्हा

परतूर शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा कडून होते पालकांची लूट

परतूर (प्रतिनिधी) गणेश शिंदे

परतूर शहरात 30 40 च्या वर इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत या शाळांमध्ये कुठल्याही प्रकारचं शासनाच्या परिपत्रकानुसार अंमलबजावणी होताना दिसून येत नाही संस्थाचालकाच्या मनाला वाटेल तेव्हा हे शालेय फीस वाढवतात तसेच कुठल्याही प्रकारची शालेय समिती किंवा शिक्षण विभागाकडून वाढीव फी संदर्भात संदर्भात मान्यता घेत नाहीत तसेच काही ठराविक पालकांना विश्वासात घेऊन फीस वाढवतात तसेच कमिशन बेसवर शाळेचा युनिफॉर्म ज्यावेळेस त्यांच्या मनात येईल तेव्हा बोलतात त्यामुळे पालकांना गणवेशाविषयी भुरुदंड भोगावा लागतो तसेच त्यांच्या मनाप्रमाणेच शालेय अभ्यासक्रम बदलतात खाजगी कंपन्यांचे पाठ्यपुस्तके घेऊन गरीब पालकावर परत अन्याय करतात ज्या शाळांना सीबीएससी ची मान्यता आहे त्यांनी एनसीआरटी चे बुक ठेवावेत ते फार रिजनेबल प्राइस मध्ये आहेत परंतु यांच्या कमिशन साठी हे लोकांवरती खाजगी कंपन्यांचे बुक पालकांवरती लादतात या पुस्तकांची किंमत खूप असते या सीबीएससीच्या पुस्तकांना शिकवण्यासाठी पात्र शिक्षक नसतात सर्व सिल्याबस वर्षभर कंप्लेंट होत नाही आणि स्वतःच पेपर काढून विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण देऊन हे संस्थाचालक विद्यार्थ्यांना पास करतात तसेच कमिशन साठी विद्यार्थ्यांचा गणवेश बदलला जातो यामागे एकच उद्देश की त्यांना त्याचे कमिशन मिळते संस्थाचालक हे फक्त पैसे कमवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करते त्यांना कोणत्याही प्रकारची चॅरिटेबल करायचे नाही फक्त कसा पैसा कमवायचा हे त्यांना माहीत आहे हे इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या काही शाळा आहेत त्यातील काहींनी फ्रेंचाईजी घेतली आहे परंतु काही शाळांना सीबीएससी ची मान्यता नसताना सीबीएससी चा पाठ्यक्रम राबवत आहेत त्यांच्यावर शासनाने कठोर कठोर करावी करायला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील जे काही शिक्षक आहेत त्यांनी इंग्लिश मीडियम डीएड केले नाही तरीदेखील आज ते शिक्षक इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवत आहेत याबाबतीत पालक ग्लॅमर पाहून बसत आहेत जे काय हुशार पालक असतील त्यांनी तात्काळ संबंधित अधिकारी संबंधित शाळा संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तसेच ज्या शाळांना सी बी एस सी ची मान्यता नाही त्यांनी कुठल्याही प्रकारे सीबीएससी चा पाठ्यक्रम अमलात आणू नये त्यांनी राज्य सरकारचा पाठ्यक्रम अमलात आणावा तसेच शासनाने प्रत्येक शाळेच्या वेळा ह्या सकाळी नऊ नंतरच असाव्यात असा जीआर काढला आहे तरी देखील काही शाळा शासनाच्या जीआरला कचराकुंडी दाखवत त्यांच्या मर्जीनुसार सुरू करत आहेत अशा शाळांवर कठोर व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी सर्व पालकांकडून मागणी होत आहे तसेच सर्व शाळातील शिक्षकांचे डीएड बीएड झाले आहे का नाही ते याबाबतची तपासणी करावी त्यानंतरच त्या शाळांना परवानगी द्यावे अन्यथा त्यांची परमिशन रद्द करावे अशा प्रकारची मागणी सर्व स्तरातील पालकांकडून होत आहे पालक हे शालेय फीस विद्यार्थी गणवेश प्रत्येक वेळेस बदलणारे पुस्तके यामुळे फार फार परेशान आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!