आपला जिल्हा

मतमोजणीच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठ परिसरातील वाहतुकीत बदल

परभणी, दि. २ ( प्रतिनिधी ) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात १७- परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी दि. ०४ जून रोजी होणार आहे.

सुरक्षिततेच्या अनुषंगाने ४ जून रोजी सकाळी ५ वाजेपासून मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यापीठ गेट (काळी कमान) येथून निवडणूक मतमोजणी प्रक्रियेचे पासधारक, संबंधीत ओळखपत्रधारक व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तरी सकाळी मॉर्निंग वॉक किंवा इतर कोणत्याही कारणास्तव प्रवेश देण्याचा आग्रह करू नये.

सेंद्रा, सायळा, बलसा, माखणी, इठलापूर, लोहगाव इत्यादी गावातील नागरिकांनी दि. ४ जून रोजी संपूर्ण दिवसभर परभणी शहरात येण्या-जाण्यासाठी नवोदय विद्यालय साकला प्लॉट, अनुसया टॉकीज या पर्यायी
मार्गाचा वापर करावा.

मतमोजणीसाठी येणारे मतमोजणी प्रतिनिधी व निकाल ऐकण्यास येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने वैद्यनाथ वस्तीगृहाच्या बाजूच्या मैदानातच पार्क करावी. तसेच मतमोजणीकरिता येणारे अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व पत्रकारांनी देवगिरी वस्तीगृहाशेजारील मोकळ्या जागेत आपल्या वाहने पार्क करावी.

मतमोजणी कक्षामध्ये व परिसरात निवडणूक आयोगाने विनीर्दिष्टीत केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त
इतर कुणालाही मोबाईल व तत्सम ईलेक्ट्रॉनीक डिव्हाईस घेवून जाता येणार नाही. करीता सर्वांनी आपापले मोबाईल स्वतःचे घरी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!