आपला जिल्हा

हाफेज मोहम्मद अफजल यांचे दुःखद निधन

पञकार मोहम्मद इलियास यांचे वडील होत

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील पत्रकार संघांचे माजी अद्यक्ष पञकार मोहम्मद इलियास यांचे वडील हाफेज मोहम्म अफजल वय वर्ष 67 यांचे बुधवार दि 08 मे रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास अल्पशा अजाराने दू:खद निधन झाले.

असून सायंकाळी 6.30 वाजता ईदगाह कब्रस्तान येथे दफनविधी होणार आहे. हाफेज मोहम्मद अफजल हे मदिना मस्जिद रेल्वे स्टेशन समोर येथे शाही इमाम होते. तेथे ते ईदची नमाज पठण करत असत. शाही इमाम म्हणून मदिना मस्जीदसेलू येथे 25 वर्ष नमाज पठनाचे कार्य केले आहे.

मदिना मस्जीद येथे त्यांनी दारूल ऊलम ची स्थापना केली या माध्यमातून .सेलु व परिसरातील अनेक विदयार्थी घडविण्याचे व शिक्षण देण्याचे काम त्यांनी केले होते तसेच इतर मदरशामध्ये जाऊन त्यांनी धार्मिक शिक्षण देण्याचे कार्य अखंडित चालू ठेवले होते.
त्यांच्या पश्चात चार मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!