आपला जिल्हा
निवडणूक कर्मचाऱ्यांनी केले टपाली मतदान
96-परभणी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

परभणी, दि. 16 (प्रतिनिधी ) : 17-परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 96-परभणी विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी दुसऱ्या प्रशिक्षणाचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी अशा एकूण 1 हजार 550 मतदान केंद्रावरील अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणुक कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान घेण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसिलदार डॉ. संदीप राजापुरे, नायब तहसिलदार गणेश चव्हाण, अनिता वडवळकर, लक्षीकांत खळीवर यांची उपस्थिती होती.

यावेळी मतदान केंद्रावरील कर्मचारी यांना प्रशिक्षणा सोबतच इव्हिएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करुन त्याबाबतच्या शंकाचे निरसन करण्यात आले. हे प्रशिक्षण दोन सत्रात पूर्ण करण्यात आले.




