आपला जिल्हा
17-परभणी लोकसभा मतदार संघाच्या संदर्भीकाचे प्रकाशन

परभणी, दि. 8 ( प्रतिनिधी ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय, परभणी यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणूक-2024 संदर्भीकाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले.




