आपला जिल्हा
जागतिक महिला दिन आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सेलू येथे रक्तदान शिबीर संपन्न.
धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था सेलू, डॉक्टर्स असोसिएशन सेलू आणि शांतिदूत परीवार पुणे,शाखा सेलू यांच्या संयुक्त उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था सेलू, डॉक्टर्स असोसिएशन सेलू आणि शांतिदूत परीवार पुणे,शाखा सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर येथील आदर्श नगरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आज संपन्न झाले.
शिबीराचे उद्घाटक म्हणून सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आर.बी.घोडके होते तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी बांधकाम सभापती तथा बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक नाना काकडे हे होते.





