आपला जिल्हा
टेनिस हॉलीबॉल, फ्लोअरबॉल खेळाला राजाश्रय मिळवून देऊ – विनोद बोराडे
- खेळ व खेळाडू यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार

सेलू (प्रतिनिधी) :भारताचे सशक्त नागरिक घडविण्यासाठी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना खेळाची आवड लागली तर त्यांची शारीरिक तंदुरुस्ती ही बौद्धिक संपन्नतेकडे घेवून जाईल. आज भारतात खेलो इंडिया व इतर उपक्रमाबरोबरच देशी विदेशी खेळांची मोठी रेलचेल सुरू आहे. यामध्ये टेनिस हॉलीबॉल व फ्लोअरबॉल खेळ मागे नाही. परंतु , या खेळाला महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, यांच्यामार्फत विविध सुविधा उपलब्ध करून, राजाश्रय, समाज आश्रय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे म्हणाले.





