आपला जिल्हा

शेकप बीड उपांत्य फेरीत

राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत 

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा -२०२४.

नूतन महाविद्यालय क्रिडांगण, सेलू येथे दि. 18 जानेवारी 2024 बुधवार वार रोजी सकाळी
सत्रातील सामना यंग इलेव्हन संभाजीनगर विरुद्ध शेकप बीड दरम्यान यंग इलेव्हन संभाजीनगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक करताना माजी खेळाडू बांगडे, संयोजक गणेश माळवे,कल्याण पवार , नितीन मंडळाचे सचिव संदीप लहाने, उपस्थित होते.
संभाजीनगर संघाने 19 षटकात 123/10 गडी बाद झाले यात धिरज भुवरे याने 53 धावात चौफेर फटकेबाजी करत करताना षटकार 2 मारले. नितीन पोलन 23, तर स्वप्निल चव्हाण 13 धावा केल्या.
बीड संघाच्या वतीने गोलंदाजी करताना शेख सिद्दीकी , यासरे, धर्मेश पटेल प्रत्येकी 2-2 गडी तर सय्यद सरफोरोज 1 गडी बाद केले.
यांचे प्रतिउत्तर देताना बीड संघाने 14 षटकात 5 बाद 124 धावा केल्या यात सय्यद सरफोरज 40, यासरे44, धर्मेश पटेल 23, धावा करत 5 गडी राखून उपांत्य फेरीत प्रवेश केला. .यंगलेव्हन छ. संभाजीनगर च्या शुभम मोहिते , इम्रान खान 2-2 गडी बाद केले .
सामनावीर पुरस्कार बीड घ्या यासेर यास पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हळ , मंडळाचे अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ लहाने , उप पोलिस निरीक्षक विजयकुमार कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला.
पंच प्रसाद कुलकर्णी, आसेर सिद्दीकी तर समालोचन अनिल शेळके, शेख यासेर यांनी केले.
अविनाश शेरे, खाजा भाई, संजय लोया, बजरंग घरकुले, विनायक खंडागळे, संदीप लहाने,राजेश राठोड,अभी चव्हाण,मसूद अन्सारी,प्रमोद गायकवाड, गजानन शेलार, दीपक निवळकर,झिशान सिद्दीकी, सलमान सिद्दीकी,मोईन शेख,मोसीन सय्यद,अजय काष्टे, मंगेश गाडगे,सुरज शिंदे,

Related Articles

Back to top button
Don`t copy text!