आपला जिल्हा

शाळा व्यवस्थापन समिती मार्फत ज्ञानतीर्थ विद्यालयात आठवडी बाजार हा उपक्रम

मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' अभियान

सेलु ( प्रतिनिधी ) येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालयात मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती आयोजित आठवडी बाजार उपक्रम (ता.१३) वार शनिवार रोजी शाळेतील क्रीडांगणावर पार पडला. शाळा व्यवस्थापन समिती आयोजित आठवडी बाजार उपक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कुपटा येथील मंडळ अधिकारी सरिका हेडगे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, मुख्याध्यापिका सौ. शालिनी शेळके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात व्यवहार कशा पद्धतीने करावे व गणितीय मोज माप विषयी माहिती व्हावी या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती आयोजित आठवडी बाजार हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात १७७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी हुबेहूब शेतकरी वेशभूषा मध्ये येऊन आपला भाजीपाला, फळे, दही, दुध, तुप आदी माल विकला. हे विकत असतांना पैशाची देवान-घेवान कशी करावी हे विद्यार्थ्यांनी आत्मसात केले. यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळाले, ग्राहक म्हणून शाळेतील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी भाजीपाला विकत घेतला. विद्यार्थ्यांनी गणित विषयातील संकल्पना समजावून घेतल्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!