सेलू ( प्रतिनिधी ) सप्तपदी मंगल कार्यालय, पारिजात कॉलनी, सेलू येथे एका ३०-३५ फुट खोल विहीरीत एका गाईचे दोन दिवसाचे वासरु पडले होते.
गल्लीतील लेकरांनी या घटने बद्दल माहिती मिळताच नगर परिषद, सेलू दिलीप दौड यांना जयशिंगशेळके यांनी फोन केला व नगर परिषद सेलू चे कर्मचारी विठ्ठल काळे, दिपक काळे यांच्या मदतीने एका लोखंडी बाजेला दोर बांधून एकजण विहीरीत उतरला व वासराला उचलून घेतले व पुन्हा बाज लोकांच्या मदतीने विहीरीतून वर ओढण्यात आली. वासराचे प्राण वाचवले. यावेळी रवि आडे, माणिक शेळके, शिंदे काका, नायबळ व नागरिक उपस्थित होती.