आपला जिल्हा

नूतन विद्यालयातील कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात; ४२ मुलामुलींच्या संघांचा सहभाग

सेलू ( प्रतिनिधी ) नूतन विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन उद्योजक रामप्रसाद घोडके यांच्या हस्ते शनिवारी, ६ जानेवारी रोजी उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, नंदकिशोर बाहेती, संतोष पाटील, के.के.देशपांडे, गणेश माळवे यांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना उद्योजक रामप्रसाद घोडके म्हणाले की, जीवनात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच एक तरी खेळ जोपासला पाहिजे. खेळांतून निर्णयक्षमता, आत्मविश्वास दृढ होण्यासाठी मदत होते. संमेलनाअंतर्गत अंतर्गत खो खो, व्हॉलीबॉल, रस्सीखेच ,टेनिस व्हाॅलीबाॅल, कबड्डी आदी सांघिक खेळांसह वैयक्तिक, मैदानी खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कबड्डी स्पर्धेत विविध वयोगटातील ४२ मुलामुलींच्या संघांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, तर आभारप्रदर्शन भगवान देवकते यांनी मानले, सौ. एन.डी. पाटील बाबासाहेब हेलसकर, प्रशांत नाईक, संजय भुमकर,बाळू बुधवंत,स्पर्धा पंच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!