आपला जिल्हा

बासरीच्या सूरावटींनी श्रोते मंत्रमुग्ध! हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सव.

सेलू दि.३०(प्रतिनिधी)- येथील संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचा शुभारंभ मराठवाड्यातील उदयोन्मुख बासरीवादक ऐनोद्दिन वारसी यांच्या बासरीवादनाने झाला.ऐन मावळतीला बासरीसारख्या सुशीरवाद्यामुळे साईनाट्य मंदिरातील वातावरण भारल्या गेले.सेलूकर श्रोते मंत्रमुग्ध झाले.

पं.रोणू मुजूमदार यांचे शागिर्द असलेल्या ऐनोद्दिन यांनी प्रथम राग ‘यमन’ सादर केला.बीनकारी अंगाने रागाची बढत करीत आपल्या मैहर घराण्याला अनुरूप प्रस्तुतीकरण केले.त्यांना तबलासंगत युवा तबला वादक व सेलू शहराचे भूमिपुत्र असलेल्या गजानन धुमाळ याने केली.सहकलावंत म्हणून अनहद वारसी, श्रीनिवास लंकावार यांनी साथ दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!