आपला जिल्हा

उद्या मनोज जरांगे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

मनोज जरांगे यांच्यावर २१ जेसीबीच्या सह्ययाने होणार गुलाब पुष्पवृष्टी

सेलू/प्रतिनिधी.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सेलू येथे होणाऱ्या सभेतून उद्या मनोज जरांगे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सेलूच्या नूतन महाविद्यालयाच्या भव्य मैदानात सभेची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे.उद्या 22 डिसेंबर रोजी सकाळी 9 वा सभा होणार असून सेलू तालूक्यातून सर्व समाज बांधवांनी या सभेसाठी खूप परिश्रम घेतले आहेत. तसेच सेलूतील अनेक समाजातील बांधवानी सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक बांधवांची जेवण्याची व्यवस्था जागोजागी करण्यात आली आहे; समाजासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे या भावनेतून त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांनी व्यक्त केल्या.

मुस्लिम समाजा तर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

मुस्लिम समाजातील बंधूनी सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व लोंकाच्या पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे. त्याच बरोबर सभेसाठी ३०० तरुन स्वयंसेवकांनी स्वतः पुढाकार घेऊन सभा यशस्वी होण्यासाठी मदत केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुस्लिम बांधवानी पाठींबा दर्शवत आपले योगदान देत आहेत.

२१ जेसीबी च्या सह्ययाने गुलाब पुष्पवृष्टी

मनोज जरांगे यांच्यावर २१ जेसीबी च्या सह्ययाने गुलाब पुष्पवृष्टी करण्याचे ठरवले आहे. सभेचे भव्य दिव्य असे स्टेज तयार झाले असून भव्य अशी रॅली, महिला व पुरुष यांची बसण्याची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजवर फक्त मनोज जरांगे पाटील हेच असतील. त्यांच्या साठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्यातून तसेच इतर तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था शहराच्या बाहेर वेग वेगळया ठिकाणी करण्यात आली आहे.
या सभेसाठी शहरातील अनेक सेवाभावी संस्थानी योगदान दिले आहे. यात डॉक्टर असोशियेशन, मेडिकल असोशीशन असे अनेक छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. या सभेसाठी जास्तीत जास्त समाज बांधव उपस्थित राहावे म्हणून गावोगावी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतःहून समाजातील बांधव प्रयत्न करत आहेत. या सभेसाठी लाखो समाज बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजातील आयोजक समितीने केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!