सेलू ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्य व तत्परता यांची दखल घेऊन विलास सोनवणे यांचीभारतीय जनता पार्टी प्रदेश अद्यक्ष मा. बावनकुळे, आमदार मेघना बोर्डीकर,अॅड. दत्तराव नारायणराव कदम मंडळ अध्यक्षयांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सेलू तालुका मंडळ उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भविष्यात आपण पक्ष बळकटीसाठी व पक्ष संघटनासाठी अधिक तत्पर राहताल व आदरणीय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे विचार व ध्येय धोरणे सर्व सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी आपले कार्य मोलाचे राहील. शुभेच्छासह आपल्या निवडीबद्दल सोनवणे यांचे सेलू तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन व राजकीय वाटचालीस शुभेच्छा ! देण्यात येत आहेत.