आपला जिल्हा

सेलू येथे खाजगी बाजार समितीचा शुभारंभ ; ७३१५ उच्च प्रतिच्या कापसाला प्रति क्विंटल भाव

उच्च प्रतिच्या मालाला ७३१५ प्रति क्विंटल भाव

सेलू ( प्रतिनिधी )  आज दि. १५.१२.२०२३ रोजी सेलू येथील महेश खाजगी बाजार समिति चा शुभारंभ करण्यात आला.

रवळगाव रोड वरील महेश एग्रो इंडस्ट्रीज येथे श्री विपिन सीतारामजी मंत्री यांनी सुरू केलेल्या खाजगी बाजार चा शुभारंभ प्रसंगी कापूस खरेदी ने मुहूर्त करण्यात आला.  शेतकरी श्री शेख दीलावर शेख यासीन, रायभान बरकुले , भानुदास रासवे , दत्तराव जाधव , गुलाबराव पौळ, सुदर्शन ताठे आदि उपस्थित होते . ज्यामध्ये उच्च प्रतिच्या कापूस  मालाला ७३१५ व रेनटच कापसला ६९०० भाव देण्यात याला सरासरी ७२०० रुपये भाव बीट पुकारून देण्यात आला. ह्यावेळी सर्व खरेदीदार व मान्यवर श्री जयप्रकाशजी बिहणी, अशोकजी मंत्री, रामेश्वरजी राठी, शैलेश तोषणीवाल, नीलेशजी बिनायके, गोपळजी काबरा, नभाराम पोवार, निर्मलजी, अभिषेकजी तायल आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यानी दररोज सकाळी ९.३० वा वाहने महेश खाजगी बाजार समिति रवळगाव रोड येथे लावावी असे आवाहन सचिव, महेश खाजगी बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!