आपला जिल्हा

लोकसहभागातून शाळा विकासाचा संकल्प

त्रैमासिक पालक सभेत

सेलू ( प्रतिनिधी ) जि.प.प्राथमिक शाळा पिंपळगाव गोसावी (ता.सेलू) येथे (ता.९ )शनिवार रोजी लोकसहभागातून शाळा विकासाचा संकल्प त्रैमासिक पालक सभेत करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंजेबाराव बुधवंत हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र प्रमुख शरद ठाकर हे होते.यावेळी मंचावर डिगांबर बुधवंत,नवनाथ बुधवंत,उज्ज्वलाताई बुधवंत उपस्थित होते.
शाळा आणि विद्यार्थी विकासासाठी पालकांची भूमिका आणि लोकसहभागातून शाळेचा कशा पद्धतीने भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता विकास करता येईल हे यावेळी मार्गदर्शन करताना शरद ठाकर यांनी सांगितले.या बरोबरच शाळा विकासासाठी रोख रक्कम देत पालकांना मदतीचे आवाहन केले.यावेळी संतोष बोरकर यांनीही शाळा विकासात समाजाचे योगदान कसे महत्त्वाचे आहे हे विषद केले.यावेळी उत्स्फूर्तपणे ३१ हजार रुपये रोख लोकसहभाग जमा झाला‌.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक प्रकाश भालेराव यांनी शाळेसाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती पालकांना दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेभाऊ थोरात यांनी केले तर रखमाजी बुधवंत यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!