आपला जिल्हा

गंगाखेड तालुक्यात वीज पडून तीन ठार; तीन जख्मी

• मयतांमध्ये माय-लेकीचा मृत्यू • १४ वर्षीय बालकाचाही समावेश

परभणी, दि.२९ (प्रतिनिधी ): गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि भेंडेवाडी येथे वेगवेगळ्या दोन घटनांत वीज पडून तीन ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे.

गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे दुपारी ३ वाजता शेतात काम करत असताना माय लेकीचा मृत्यू झाला असून, भेंडेवाडी येथील घटनेत १४ वर्षीय बालकाचा मृतामध्ये समावेश आहे.

डोंगरपिंपळा येथे शेतात काम करत असताना वीज पडून आई सविता विठ्ठल कतारे (४०) आणि मुलगी निकीता विठ्ठल कतारे (१८) यांचा मृत्यू झाला. तर गंगाखेड तालुक्यातीलच भांडेवाडी येथे वीज पडून ओंकार किशन घुगे या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू असून, त्याचा चुलता गोविंद विनायक घुगे (३०) हे जखमी झाले. तसेच श्रीमती सुनिता काशिनाथ शेप (४८) आणि श्रीमती रेणुका काशिनाथ शेप (२७) या मायलेकी जखमी झाल्या असल्याचे गंगाखेडचे उप विभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!