आपला जिल्हा
सेलूतील विविध स्तरांतून गिरीश लोडाया यांना भावपूर्ण आदरांजली
एक सच्चा कार्यकर्ता, बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये गिरीश लोडाया सरांचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांच्या निधनामुळे सेलूच्या सार्वजनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चळवळीतील एक नि:स्वार्थी, प्रेमळ माणूस, सच्चा कार्यकर्ता, बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत सेलूकरांनी गिरीशसरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात रविवारी, २४ सप्टेंबररोजी सकाळी साडे दहा वाजता शोकसभा आयोजिण्यात आली होती. या वेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, उद्योजक महेश खारकर, प्रेमचंद लोढा, संतोष कुलकर्णी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.




